मंथन फौंडेशन

एक नवी दृष्टी....

रजि. एफ/३४७३४/कोल्हापूर स्थापना: २०-नोहेंबर-२०१३

जाणून घ्या आमच्याबद्दल थोडेसे

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील सर्वजण पण परिस्थितीशी मैत्रीपूर्ण व्यवहार, अतिशय आनंदाने हसत खेळात आयुष्याचे क्षण वेचून त्याची फुले करणे आणि समाजाशी,गुरुजनांशी,मित्रांशी तसेच आई वडिलांशी सुदंर नात्यांचे बंध एकत्र करून एकप्रकारच्या पुष्प माळा तयार करणे, पुष्पमाळेच्या गंध सहजगत्या गरजू गरीब लोकांना देण्याचे कार्य त्याचबरोबर नाटिका,पथनाट्य,गुरुपौर्णिमा, विध्यार्थी दिन, शिक्षक दिन अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये हि प्राविण्य असणारे माझे सहकारी मित्र परिवार. अशी ओळख असणारा आमचा ग्रुप. मला या ग्रुप ला एकत्र बांधून ठेवायचे होते आणि तशीच इच्छा परमेश्वराची होती कि काय कोण जाणे ? २० नोव्हेंबर २०१३ या माझ्या परिवाराला सामाजिक कार्य करण्याची इच्छा बोलून दाखवली, तसे तेही ठरवूनच आले होते कि काय.... लगेचच होय.. करूया कि.... असे बोलले आणि आम्ही लगेचच वेळ न वाया घालवता या नावाने सामाजिक कार्यास सुरवात केली ती " मातोश्री वृद्धाश्रम" चंबुखडी, शिंगणापूर रोड, कोल्हापूर येथूनच. वृद्धाश्रम ला भेट देऊन तेथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

लहान मुलांना खाऊ वाटप,गरीब विध्यार्थ्यांना वह्या वाटप,स्वच्छता, वृक्षारोपण अश्या विविध प्रकारची विविध सामाजिक कार्य आम्ही करू लागलो. महाविद्यालयीन कार्यकाळ संपला आणि प्रत्येकाने मिळेल ती नोकरी पत्करली. समाजकामाची आवड असूनही नोकरीमुळे एकत्र येण्याची वेळ कमी कमी होत होती आणि म्हणूनच थोडा मोठा आणि नवीन निर्णय घेण्याचे ठरविले. may I help you हे नाव बदलून दुसरे नाव ठेवायचे असे ठरले, त्याप्रमाणे विविध नावांची चर्चा करून एक नाव शेवटी ठरविले.
समाजामध्ये, तरुणाईमध्ये विचारांचे मंथन घडवून त्यातूनच नवनवीन रत्न, नेतृत्व, कर्तृत्व निर्माण करण्यासाठी ०६ एप्रिल २०१६ रोजी मंथन फौंडेशन या नावाने ट्रस्ट धर्मादाय आयुक्त कोर्टा यांच्याकडे रजिस्टर केली. या सुरु झालेल्या कलियुगामध्ये लोकांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली आहे, संस्कार, संस्कृती अश्या शब्दांकडे त्यांचे लक्ष कमी कमी होत आहे. तरुणाई आपली आयुष्याकडेही जितके पाहिजे तितक्या अपेक्षेने नाही पाहत आणि म्हणूनच आम्ही संस्थेच्या माध्यमातून तरुणाईला एक नवी दृष्टी देण्याचे काम करत आहोत.

आयुष्यामधे एक "ध्येय" असावेच आणि ते मिळवण्यासाठी "संघर्ष" हा करावाच तो कोणत्याही प्रकारचा संघर्ष असू शकतो मात्र संघर्ष हा एकत्र येऊन करा म्हणजे आपल्यात एकता असावी तेव्हा ध्येय साध्य लवकर होते.

२०१३ पासून करत असणारे सामाजिक कार्य हे चार प्रकल्पामध्ये चालते.

1) “MAY I HELP YOU” यामध्ये अंगणवाडी ते १० वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी काम करतो आहोत.

2) “YOUTH POWER” या प्रकल्पामध्ये आम्ही तरुणाईसाठी काम करतो

3) “HELPING HAND” हा प्रकल्प महिलांसाठी चालतो

4) “EARTH CARE” हा प्रकल्प पर्यावरण संदर्भात चालतो.

तसेच या चार प्रकल्पाबरोबर जिल्हा परिषद च्या शाळा कोल्हापूर जिल्हातील शैक्षणिक वर्षासाठी "वर्षभराचा आयाम" या प्रकल्प अंतर्गत दत्तक स्वरूपात घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना लहानवयातच समाज, व्यक्ती, त्यांच्या संकल्पना, शैक्षणिक गुणवत्ता, संस्कार, संस्कृती, विचार, आई वडील, गुरुजन, आपले करिअर त्याचबरोबर विविध खेळ, विविध कलागुण, बाजार ज्ञान, व्यवहार ज्ञान, व्यवस्थापन इ. अनेक गोष्टींचे ज्ञान तसेच माहिती, त्या गोष्टी आत्मसात करणे, त्याचा आपल्याला उपयोग करून घेणे अशा विविध अंगांनी विध्यार्थ्यांना नटवणे, त्यांना समृद्ध करणे हाच आमचा हेतू.

याशिवाय वाचकांसाठी विविध पुस्तके / ग्रंथ/ कादंबरी इ. सहज उपलब्ध व्हावे तसेच लोकांना वाचनाची आवड लागावी या हेतूने २० सप्टेंबर २०१६ रोजी "मंथन सार्वजनिक वाचनालय" कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कोर्ट यांच्याकडे रजिस्टर केले आहे. यातून हि अनेक चर्चासत्रे, वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ. अनेक कार्यक्रम घेतले जातात.

तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी "मंथन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र" सुरु केले आहे. मुलांनी अभ्यास कसा करावा? लक्षात कसे ठेवावे? ध्येय कसे निवडावे? तसेच वेगवेगळी चर्चासत्रे वेगवेगळ्या विषयामध्ये, विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे तसेच यश या शब्दाच्या पुढे निघून जाणे अशा बऱ्याच गोष्टींचे मार्गदर्शन या माध्यमातून आम्ही विध्यार्थ्यांना देतो.

वरील विविध प्रकल्पामधून आम्हाला जमेल त्या पद्धतीने गरीब, गरजू लोकांना सहज मदत उपलध व्हावी या हेतूने आमचे सहकारी कायम कार्यरत असतात ते आपल्या शुभ आशीर्वादानेच. आपले सहकार्य कायम आम्हाला मिळते, कधी कोण मार्गदर्शन करतात तर कधी प्रोत्साहन देतात. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळ्या स्वरूपात मदत होते. तसेच वर्तमान पत्रांचे विशेष सहकार्य होते.


सर्व मान्यवरांचे आभार !
आमच्या संस्थेची माहिती घेतल्याबद्दल संस्थेच्या वतीने धन्यवाद !!!