मंथन फौंडेशन

एक नवी दृष्टी....

रजि. एफ/३४७३४/कोल्हापूर स्थापना: २०-नोहेंबर-२०१३

Events

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

२० एप्रिल २०१६ रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर महानगर पालिकेची शाळा यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर ला भेट देण्यात आली. येथील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिक्षकांशी चर्चाकरून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वराळे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, शाळेचे विकी भोसले सर, पाटील सर, पंकज पाटील, महेंद्र चव्हाण आदी सदस्य उपस्थित

20

Apr 2016

महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

11 एप्रिल २०१६ रोजी महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्ताने बिंदू चौक कोल्हापूर येथील महात्माजींच्या पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र वराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपाध्यक्ष प्रवीण जाधव, खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, हरीदास कांबळे, महेंद्र चव्हाण, आरती सुतार,  तेजश्री यादव आदी उपस्थित होते.

11

Apr 2016

८ मार्च जागतिक महिला दिन साजरा

८ मार्च २०१६ जागतिक महिला दिन  निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, गंगावेश कोल्हापूर येथील राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याला उपप्राचार्या सौ बडस्कर मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून सुरु झालेला महिला बचत गटाचे माहीला सबलीकरण या विषयातील पथनाट्य सादरीकरण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वराळे यांनी उपस्थित विद्यार्थी / विद्यार्थिनींना महिला एकजुटी आणि स्वावलंबन या विषयात मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक वर्ग उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, प्रवीण पाटील, हरीदास कांबळे, महेंद्र चव्हाण, आरती सुतार, सायली सालपे, तेजश्री यादव आदी पथनाट्य चा ग्रुप उपस्थित होते.

08

Mar 2016

अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप

दरवर्षीप्रमाणे लहानमुलांना खाऊ वाटप करण्यासाठी ०७ मार्च २०१६ रोजी सकाळी १० वाजता ओम गणेश कॉलनी, संभाजीनगर,कोल्हापूर येथील विद्यार्थी भवन हॉल मधील अंगणवाडी येथे भेट देऊन विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वराळे, उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, अंगणवाडीच्या सौ तलवार मॅडम, सौ कांबळे मॅडम सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, महेंद्र चव्हाण, आरती सुतार, कमलेश जांभळे आदी सदस्य उपस्थित होते.

07

Mar 2016

मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट

संस्थेला २ वर्षे पूर्ण झालीत म्हणून आणि एक जिव्हाळ्याचे सामाजिक बंध जुळण्यासाठी तुन्हा त्याच ठिकाणी गणेश नगर, चंबूखडी, कोल्हापूर येथील "मातोश्री वृद्धाश्रमास" भेट देउन तेथील आजी आजोबांशी मनमोकळ्या गप्पा मारण्यात आल्या. यावेळी वृद्धाश्रमास ३० किलो ज्वारी देण्यात आली. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या प्रमुख वैशाली राजशेखर मॅडम, संस्थेचे अध्यक्ष वराळे, उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र चव्हाण, आरती सुतार, सायली सालपे, हरीदास कांबळे, आदी सदस्य उपस्थित होते.

20

Nov 2015

विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल वाटप

१५ आगस्ट २०१५ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दि मॉडर्न स्कूल, संभाजीनगर येथे भेट देण्यात आली.  सौ जोशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र वराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत आणि राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल वाटप करण्यात आले. तसेच खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, मुख्याध्यापक महेंद्र जोशी सर, सौ गिरीजा जोशी,श्री गौतम कांबळे सर कांबळे सर महेंद्र चव्हाण, आरती सुतार, कमलेश जांभळे आदी सदस्य उपस्थित होते.

15

Aug 2015

दि मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

५ आगस्ट २०१५  रोजी दि मॉडर्न स्कूल, संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांची भेट घेण्यात आली. येथे बाजूच्या झोपडपट्टीतील गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असणारे विद्यार्थी अगदी आनंदाने शाळेत येतात. ह्या विद्यार्थ्यांना नीटसं पोटभर जेवण हि मिळत नाही अशा मुलांसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने येथील १३० विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आला तसेच र्विद्यार्थ्यांशी गप्पा- टप्पा करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वराळे, उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, मुख्याध्यापक नरेंद्र जोशी सर, कांबळे सर महेंद्र चव्हाण, आरती सुतार, कमलेश जांभळे आदी सदस्य उपस्थित होते.

05

Aug 2015

छत्रपती शिवाजीराजे जयंती साजरी

छत्रपती शिवाजीराजे भोसले जयंती निमित्ताने अर्धा शिवाजी पुतळा, कोल्हापूर येथील राजेंच्या अर्धाकृती पुतळ्यास संस्थेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वराळे, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, महेंद्र चव्हाण, हरीदास कांबळे, आदी सदस्य उपस्थित होते.

20

Jul 2015

वृक्षारोपण

२० मे २०१४ रोजी चंबूखडी,कोल्हापूर येथील पाण्याची टाकी येथे सामाज्याचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने  २५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र वराळे, उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके, खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र चव्हाण, हरिदास कांबळे आदी सदस्य उपस्थित होते. 

20

May 2014

डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने महिलांसाठी प्रबोधनपर भाषण बिंदू चौक, कोल्हापूर

डॉ. आंबेडकर जयंती चे औचित्य साधून तळागाळातील अशिक्षित महिलांना तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी समोर उपस्थितांना श्रीमती कुरणे मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र वराळे यांनी प्रमुख वक्त्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले आणि शिकण्यासाठी धडपड करा असे उपस्थितांना सांगितले. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.

14

Apr 2014

मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट

१ वर्षांपूर्वी जेथून संस्थेची सुरवात केलेली तिथेच आणखी एकदा भेट देण्याच्या उद्देशाने गणेश नगर, चंबूखडी, कोल्हापूर येथील "मातोश्री वृद्धाश्रमास" भेट देउन तेथील आजी आजोबांशी मनमोकळ्या गप्पा मारण्यात आल्या. तिथेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या प्रमुख वैशाली राजशेखर मॅडम, संस्थेचे अध्यक्ष वराळे, उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र चव्हाण, आरती सुतार आदी सदस्य उपस्थित होते.

20

Nov 2013

मंथन फौंडेशनची स्थापना आणि मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट आणि विविध कार्यक्रम

मंथन फौंडेशनचे संस्थापक श्री रवींद्र वराळे यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधूनच गणेशनगर, चंबूखडी, कोल्हापूर येथील "मातोश्री वृद्धाश्रमास" भेट देउन तेथील आजी आजोबांशी मनमोकळ्या गप्पा मारण्यात आल्या त्याच बरोबर गंमती जंमतीचे खेळखेळण्यात आले, आणि तिथेच मंथन फौंडेशनची स्थापना करण्यात आली. समाजसेवेची सुरवात आजी आजोबांचे आशीर्वाद घेऊनच झाले. शेवटी सर्वांसोबत जेवण झाले. यावेळी वृध्दाश्रमास खाऊ आणि झाडे वाटण्यात आली. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या प्रमुख वैशाली राजशेखर मॅडम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रवींद्र वराळे, उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस  अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र चव्हाण, हरिदास कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.

10

Nov 2013

अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप

२१ जुलै २०१५ रोजी सकाळी ११ वाजता ओम गणेश कॉलनी, संभाजीनगर,कोल्हापूर येथील अंगणवाडी येथे भेट देण्यात आली. शाळेच्या प्रवासास सुरवात करणाऱ्या ४३ विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वराळे, उपाध्यक्ष निशांत घोरपडे, प्रवीण जाधव, सेक्रेटरी प्रसाद कटके खजानीस अविनाश कांबळे, व्यवस्थापक पंकज पाटील, महेंद्र चव्हाण, आरती सुतार, कमलेश जांभळे आदी सदस्य उपस्थित होते.

21

Jul 2013