मंथन फौंडेशन

एक नवी दृष्टी....

रजि. एफ/३४७३४/कोल्हापूर स्थापना: २०-नोहेंबर-२०१३

मंथन परिवार

काहीतरी करण्याची धडपड, असच न मरण्याची इच्छा आणि समाजाप्रती प्रेम, गरीब लोकांसाठी मदत करण्याची धडपड तसेच तरुणपणाचा जोश उधळणारी पण भानावर असणारी, निर्व्यसनी, नेहमी हसत - खेळत आणि विशेषतः समजूतदार माझा परिवार. “मंथन परिवार”

आम्ही वचनबद्ध

आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करणारी आमची तरुणाई तेवढीच समाजाला, गरीब लोकांना मदतीसाठी, सहकार्याप्रती तत्पर असते

सहकार्याप्रती तत्पर

आम्ही लावलेले सहकार्याचे, मदतीचे रोपटे आपल्या सहकार्यानेच वटवृक्ष होईल

छोटीशी आशा

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळणेसाठी आणि त्यांच्या गुणात्मक विकासाठी आम्ही बांधील आहोत

आमची कार्ये

मी काही मदत करू का?

गरीब गरजू लहान मुलांसाठी/ विध्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतो, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी, ध्येयाची दिशा निश्चित करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

युवकांची शक्ती

युवक, तरुण वर्गाला वाईट व्यसनापासून मुक्ती ते देशभक्ती पर्यंत आणण्यासाठी, आत्महत्येपासून आत्मबलिदान, त्यांना चांगली प्रेरणा मिळावी आणि त्यातून त्यांचे आयुष्य फुलावे एवढेच आमचे प्रयत्न.

मदतीचा हात

तळागाळातील अशिक्षित, होतकरू,गरीब महिलांना स्वावलंबी होण्याकरिता वेगवेगळ्या उद्योगांची माहिती तसेच त्यासाठीच्या शासकीय योजनांची माहिती देऊन, उदयोगशिल बनवून त्यांना आत्मसन्मान मिळवून देणे.

अंधारातून प्रकाशाकडे

DARK
(Development, Achievement, Risk & Knowledge)
५ वी ते १० वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी बौद्धिक गुणात्मक प्रकल्प/वर्षभराचा आयाम

मंथन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

लोकांना वाचनाची आवड लागावी,वाचकांसाठी विविध पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, ध्येयाबद्दल निश्चिती आणि त्यासाठी कृतीचे पाऊल याचे मार्गदर्शन

पृथ्वीची काळजी

समाजाबरोबर पर्यावरणाचा हि समतोल राहावा यासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती, धुराचे व्यवस्थापन इ. करायला हवे आणि हे मी हि करू शकतो. म्हणून कर्तव्याचे एक पाऊल.

सहकार्यासाठी

आपण केलेले सहकार्य, दिलेली मदत कोणाचेतरी आयुष्य फुलवू शकते

ध्येय

जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल, तर तुमचे ध्येय सांभाळणारे ध्येय ठेवा, आपली उर्जा मुक्त होते आणि तुमची आशा जागृत करते.

संघर्ष

स्वतःमधील वाईट गुणांबरोबर संघर्ष करा, समाजाच्या वाईट चालीरीतींशी संघर्ष करा, संघर्ष हा कोणत्याही प्रकारचं असू शकतो, पण विधायक असावा. कारण संघर्ष्यातूनच ऊर्जा निर्माण होते, अशा उर्जेतूनच स्वतःला प्रकाशित करा.

एकता

जेव्हा आपण एकत्र येतो तेंव्हा आपली ताकद वाढते, आपली प्रगती होते, मनातील भय जाते, चांगल्या कार्याला ताकद मिळते.विशेषतः एकी हे जीवनाचे एक मोठे स्वरूप आहे. एकता समाजातील संस्कार,संस्कृतीचे गूढ आहे.

आपण कोणालातरी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे...

इतरांना मदत केल्याने आपल्याला कशा प्रकारे मदत केली जाते हे शिकता येते.
स्वत: ला बरे, आनंदित करण्यासाठी स्वत: ला कसे देणे आहे
ते शिकणे हे इतरांना कसे शिकवावे हे शिकण्यांचा एक भाग आहे.
आपण इतरांबरोबर कंटाळवाणा असल्यास, जेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या जातात
तेव्हा आपण सर्वकाही इतरांना देऊ शकू.

“मंथन परिवार”

समाजसेवेची आवड आणि तीच फॅशन तसेच त्यातच माझे करिअर हे थोड्या वेळानेच कळाले मला? असे मनोमनी वाटते. आपण सर्व जण ज्याच्या मागे धावतो त्याला आपण सर्व करिअर, ध्येय आणखी बरेच काही म्हणतो पण त्यालाच माझ्या आनंद म्हणतात. आपल्याला आनंद कोणत्या गोष्टीतून मिळतो आणि तो चिरकाल टिकवण्यासाठी आपण तयार आहोत का ? कि दुसऱ्याचा आनंद पाहून विना तयारीचे आपण मैदानात उतरलोय?, जरी उतरलो तरी तेवढे सोसण्याची तयारी किंवा त्याची सवय करून घेण्याची आपल्यामध्ये धमक आहे का? हे ज्यावेळी आपण प्लॅन करूनच, तयारीनेच, नक्की ठरवूनच मैदानात उतरू, त्यावेळी आपल्या समोर उभा रहाण्याची धाडस कदाचित कोणी केली तर ती आपलीच सावली असेल. असे काही मला माझ्या आनंदाचे गमक समजले आणि त्याच स्टाईलचे, त्याच विचारांचे माझे मित्र मला भेटले.काहीतरी करण्याची धडपड, असच न मरण्याची इच्छा आणि समाजाप्रती प्रेम, गरीब लोकांसाठी मदत करण्याची धडपड तसेच तरुणपणाचा जोश उधळणारी पण भानावर असणारी, निर्व्यसनी, नेहमी हसत - खेळत आणि विशेषतः समजूतदार माझा परिवार. “मंथन परिवार”श्री रविंद्र महादेव वराळे (बी कॉम, एल एल बी)

संस्थापक अध्यक्ष,
  • मंथन फौंडेशन, कोल्हापूर,
  • मंथन सार्वजनिक वाचनालय, कोल्हापूर,
  • मंथन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर
कवितासंग्रह
  • शब्द फुलांचा मोगरा (कदंब पुरस्काराने सन्मानित) (२०१३)
  • कुंपणापलीकडे (२०१६)
व्याख्यानमाला
  • स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन,
  • ध्येयाबद्दल निश्चिती आणि त्यासाठी कृती याचे मार्गदर्शन,
  • संस्कार आणि संस्कृतीचा धरूनच विकासाचे, प्रगतीचे धडे.तसेच उद्योगशील कसे व्हावे?
  • युवकांना आत्महत्येपासून आत्मबलिदान, आनंदाचे रहस्य, सुंदर जगण्याचे गमक आणि महत्व इ. विषयात महत्वपूर्ण मार्गदर्शन.
  • शालेय विध्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा? का करावा? परिस्थितीशी आणि समाजाशी कशी सांगड घालावी?

आमचे सहकारी

श्री. निशांत महादेव घोरपडे

उपाध्यक्ष

बी कॉम, जी डी सी ए

श्री. प्रवीण धनजी जाधव

उपाध्यक्ष

बी कॉम, एम.एस.डब्लू.

सौ. श्वेता रविंद्र वराळे

सेक्रेटरी

एम. बी. ए.

श्री. अविनाश रवींद्र कांबळे

खजानीस

बी कॉम

श्री. महेंद्र चव्हाण

उपाध्यक्ष, मंथन सार्वजनिक वाचनालय

बी कॉम, एल एल बी

सौ शोभा संजय पन्हाळकर,

सेक्रेटरी, मंथन सार्वजनिक वाचनालय

 

श्री. पंकज आकाराम पाटील

व्यवस्थापक

बी कॉम

श्री. प्रवीण संभाजी पाटील

सदस्य

बी कॉम, जी डी सी ए

श्री. हरिदास कांबळे

सदस्य

बी कॉम,