ध्येय
जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल, तर तुमचे ध्येय सांभाळणारे ध्येय ठेवा, आपली उर्जा
मुक्त होते आणि तुमची आशा जागृत करते.
संघर्ष
स्वतःमधील वाईट गुणांबरोबर संघर्ष करा, समाजाच्या वाईट चालीरीतींशी संघर्ष करा, संघर्ष
हा कोणत्याही प्रकारचं असू शकतो, पण विधायक असावा. कारण संघर्ष्यातूनच ऊर्जा निर्माण
होते, अशा उर्जेतूनच स्वतःला प्रकाशित करा.
एकता
जेव्हा आपण एकत्र येतो तेंव्हा आपली ताकद वाढते, आपली प्रगती होते, मनातील भय जाते,
चांगल्या कार्याला ताकद मिळते.विशेषतः एकी हे जीवनाचे एक मोठे स्वरूप आहे. एकता समाजातील
संस्कार,संस्कृतीचे गूढ आहे.